वीर सावरकर हे निःस्वार्थ राष्ट्रभक्तीचं नाव आहे…!

१) नेहरू, गांधी-काँग्रेसने “शिवाजी हा लुटारूचा राजा होता; सुरत लूट, अफजलखान वध हे शिवाजीचे अक्षम्य गुन्हे आहेत” अशी छत्रपतींबद्दल एकेकाळी वक्तव्ये केली होती. तेव्हा वीर सावरकारांनी हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून भाषणांत, पुस्तकांत विरोध केला होता. आज हीच काँग्रेस महाराष्ट्रात छत्रपतींच्या नावाने राजकारण करून हिंदू धर्माच्या जातींत तेढ निर्माण करतेय.

२) भगत सिंगच्या हिंसक कृतीचं समर्थन करणार नाही, हे तेव्हा गांधी म्हणाले होते (नंतर स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणाऱ्या मुसलमानाला ‘भाई अब्दुल रशीद’ असं म्हणत शिक्षा होऊ नये यासाठी ब्रिटिश सरकारला विनंतीअर्ज गांधींनी दिला होता.) आज हीच काँग्रेस ‘भगतसिंग हसत-हसत फासावर गेला, सावरकरांसारखी माफी मागितली नाही’ असं म्हणत भगतसिंग vs सावरकर हा वाद लावतेय आणि मूर्ख भारतीय फसतात; भगतसिंगने वीर सावरकरांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकावर ब्रिटिश सरकारने बंदी घातलेली असताना त्या पुस्तकाची प्रत छापली आणि सावरकरांना रत्नागिरीत नजरकैदेत असताना पाठवली होती. भगतसिंगच्या कृत्याचे समर्थन सावरकर त्यांच्या अग्रलेखातून करत होते (अर्थात दुसऱ्या नावाने) कारण राजकारणासंबंधी बोलायला सावरकरांवर बंदी होती… पुढे बंदी उठल्यावर उघडपणे समर्थन केले.

३) चंद्रशेखर आझाद यांच्या हिंसक मार्गाची निंदा केली होती गांधींच्या काँग्रेसने, आज हीच काँग्रेस ‘चंद्रशेखर आझादांनी यांनी गोळी खाल्ली पण सावरकरांसारखी माफी मागितली नाही’ अशी बोंब उठवत आहे.

४) सुभाषचंद्र बोस यांचे आणि काँग्रेसचे किती मतभेद होते? सुभाषचंद्र बोसांना तेव्हाच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसमधून काढून टाकले होते आज तीच काँग्रेस, कम्युनिस्ट ‘सावरकर देशभक्त नाहीतर सुभाष बाबू खरे देशभक्त’ यांवर वाद करतेय?

काँग्रेसच्या मते, वीर सावरकर ही तुरुंगात मरायला हवे होते म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचे हिरो गांधी-नेहरू आणि एकटा काँग्रेस पक्ष, त्यांची विचारधारा हे त्यांना दाखवता आलं असतं. काँग्रेसच्या दुर्दैवाने वीर सावरकर अंदमानातून जिवंत परत आले आणि काँग्रेस समोर एक वेगळी विचारधारा उभी राहिली, हे एवढं एक यांच्या डोळ्यांत खुपतेय.

राहुल गांधीने इंदिरा गांधी वीर सावरकरांबद्दल काय म्हणाल्या होत्या, त्यांनी सावरकरांच्या त्यागाबद्दल जे सांगितले हे समजायला हवे.

वीर सावरकर हे निःस्वार्थ राष्ट्रभक्तीचं नाव आहे, इटालियन गांडुला हे शोभायचं नाही.

– हितेश कल्याणकर

शहिद

जन्नत यही पाई उसने जीसका हिंदुस्थान वतन हो,

ख्वाईश बस यही की जनाजे में तिरंगा कफन हो।

फूल तो हर कबर पे चढाते है,

पर कबर मेरी पुरी बाग-ओ-चमन हो।

तेरे हिफाजत में कुर्बान होना आखीर यही है किस्मत,

तो शहादत मजहब मेरा, शहिद मेरी पहचान हो।

– चिन्मेशस्य भ्राता